



शाहूपुरी येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा
राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयात जागतिक मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्याने विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन सोहळा साजरा करताना सकाळच्या सत्रात नवपिढीस मराठी साहित्य विश्वाची ख-या अर्थाने ओळख होण मराठी विषयाच्या अनुषंगाने मराठी विषयाची ग्रंथसंपदा तसेच नवपिढीने तयार केलेल्या कवींच्या चित्राकृतींसह रेखाटलेल्या कवितांचा ठेवा असलेली साहित्य संपदेनेयुक्त अशा मराठी भाषा साहित्य जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य जत्रेस सर्व मुलांनी आवडीने भेट देऊन आपल्या मातृभाषेची नव्याने ओळख करून घेतली.
दुपारच्या सत्रात नम्रता होसकट्टी व युगंधरा पवार यांनी *’माझ्या मराठीची गोडी’* या कवितेचे सादरीकरण केले. समृद्धी,सिमरन व आराध्या यांनी *’माझी माय सरस्वती’* या कवितेचे गायन केले.
काव्या काकडे ,मृणाली भिसे, प्राची घोरपडे यांनी *’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’* ही कविता सादर केली तर अक्षरा मोहीकर या मुलीने *’माझी मातृभाषा मराठी’* या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.अथर्व माने याने *माझी ‘मातृभाषा मराठीची महती* या कवितेचे वाचन केले. तसेच,भरत कोकरे याने *प्राचीन मराठी मातृभाषेविषयी* माहिती सांगितली.प्रथमेश वैशंपायन याने *जर मराठी भाषेत ‘ळ’ नसता तर काय झाले असते* याविषयी माहिती सांगितली.
तर ऋतुजा गवळी हिने *मराठी कवींच्या वर्गात बसले तर त्यांच्याकडून काय शिकून घ्यावे* हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या सोहळ्याची सांगता यश रुपेश सुतार याने अत्यंत जोशपूर्ण आवाजात गायलेल्या *विंचू चावला* या भारुडाने झाली. याप्रसंगी नवनाथ कांबळे यांनी आपल्या मनोगताद्वारे मराठी भाषा आणि तिचे महत्त्व याविषयी आपले विचार व्यक्त केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नील शिंदे व पार्श्व सपकाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक मराठी विषय शिक्षिका सौ.पी.एस.निंबाळकर यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मधुकर जाधव चंद्रकांत देशमुख,सौ.गीता देसाई,डी.डी.कुचेकर,पी.ए.भोसले यांचे सहकार्य लाभले.
सांस्कृतिक कार्य समिती,
शाहूपुरी माध्यमिक विद्यालय शाहूपुरी सातारा.
२७ फेब्रुवारी २०२५.